हृदयद्रावक... सासरच्या छळाला कंटाळून 2 चिमुकल्यांसह कालव्यात उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
दौंड, 21 फेब्रुवारी : दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीत सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने आपल्या दोन चिमुकल्यासह नवीन मुठा कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
नंदिनी लक्षदीप वांजळे असं या महिलेचं नाव आहे. तर मल्हार 2 वर्षांचा तर मुलगी मधुरा वांजळे ३ वर्षांची आहे. चिमुकल्यासह आत्महत्या केल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी लक्षदीप वांजळे या विवाहितेला सतत फोर व्हीलर गाडी आणि म्हशी घेण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपयांची मागणी सासरच्या लोकांकडून होत होती. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.

विवाहित महिलेनं दौंड तालुक्यातील यवत गावाच्या हद्दीतील नवीन मुठा कालव्यात उडी मारून आपल्या दोन चिमुकल्यासह आत्महत्या केली.

नंदिनी लक्षदीप वांजळे आणि मल्हार (वय वर्ष २) आणि मुलगी मधुरा वांजळे (वय वर्ष ३) हे तिघे कालव्यातील पाण्यात मृत अवस्थेत आढळून आले आहेत. लग्नात ठरल्या प्रमाणे हुंडा न मिळाल्याने सासरच्या लोकांकडून नंदिनीचा वेळोवेळी छळ सुरू होता, तिच्याकडे पती,सासू,सासरे,नणंद यांच्याकडून लग्नात ठरलेल्या हुंड्यातील रक्कमेपैकी एक लाख रुपये न दिल्याने तिचा मानसिक त्रास सुरू होता. याच त्रासाला कंटाळून अखेर नंदिनीने आपल्या दोन चिमुकल्या सह कालव्यात उडी घेऊन जीवन याञा संपवली.

याबाबत मृत नंदिनीच्या भावाने सासरच्या लोकांविरुद्ध यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास यवत पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments