Pandharpur Live-
सांगली, दि. 16 : कै. आर. आर. ( आबा) पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य मा णसांच्या हिताला नेहमीच प्राधा न्य दिले. अशा या थोर नेत्याचे समाधीस्थळ असलेल्या निर्मलस्थळा ची प्रलंबित कामे येत्या वर् षभरात पूर्ण करून ते विकसीत केल ी जातील. या कामासाठी आवश्यक अस णारा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख् यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अंजनी (ता.ता सगाव) येथील त्यांच्या समाधीस् थळी पुष्पहार अर्पण करून श्री. पवार यांनी अभिवादन केले. यानं तर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत् री बाळासाहेब पाटील, आमदार सु मनताई पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजी त राऊत, माजी आमदार सदाशिव पाटी ल, अंजनीच्या सरपंच स्वाती पाटी ल यांच्यासह मान्यवर उपस्थित हो ते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणा ले, आर. आर. पाटील हे समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे नेते हो ते. सामान्य माणसाचे हित जोपासू न त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमी तत् पर असत. दुष्काळी भागातील शेती ला पाणी उपलब्ध करून देण्यात त् यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यां च्यावर सोपविलेल्या खात्यांची ज बाबदारी त्यांनी समर्थपणे सांभा ळून त्या खात्यांची उंची वाढवि ली. आर. आर. आबा यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभि यान राज्यात यशस्वीपणे राबविले. राज्य शासनामार्फत देण्यात ये णाऱ्या स्मार्ट व्हिलेज पुरस्का राचे कै. आर. आर. (आबा) पाटील स्मा र्ट व्हिलेज पुरस्कार असे ना मकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घे ण्यात येणार असून हे पुरस्कार आ र. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी वितरीत करण्याचा मानस असल् याचे त्यांनी सांगितले.
आर. आर. पाटील यांच्या सांगली ये थील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर् थसंकल्पात उपलब्ध करून दिला जा ईल. सांगली जिल्ह्यातील सर्वच वि कास कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यातील ज्या गावां ना सिंचन योजनेचे पाणी पोहोचले ले नाही त्या गावात पाणी देण्या साठी प्रयत्न केले जातील. आमदार सुमनताई पाटील यांनी सुचविलेली सर्व कामे मंजूर केली जातील.



0 Comments