Pandharpur Live-
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या 'मेसा' (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन) व 'स्कायफी लॅब, बेंगलोर' यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर. सी. एअरक्राफ्ट' या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
स्कायफी लॅबचे गुरुदत्त सानु व मावन भास्कर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. रिमोट कंट्रोलद्वारे विमानाचे वर्कींग व त्यातील इलेक्ट्रॉनिक्सची ओळख तसेच त्याच्या अंतर्गत बाबी या संदर्भात उपस्थित तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर त्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेले हे विमान साधारण दीड किलोमीटर उंच अंतरावर उडाले. आकाशात उडालेले विमान साधारण दहा मिनिटे आकाशातच तरंगत राहिले. यात अजून सुधारणा करण्याची योजना असून भविष्यात याचा उपयोग ड्रोन कॅमेऱ्याप्रमाणे होईल.
यामध्ये इंजिनिअरिंग व डिप्लोमा कॉलेजचे ९० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते तर या कार्यशाळेमध्ये संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ व समन्वयक प्रा. संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली बनविलेले विमान अवकाशात उडविले. हे विमान विद्यार्थ्यांनी तयार केले असून यामध्ये इलेक्ट्रिक साहित्य व इतर साधनांची रचना व संकल्पना संपूर्णपणे विद्यार्थ्यांची आहे. यावेळी प्रमुख पाहुणे गुरुदत्त सानु म्हणाले की, ‘नवनवीन संशोधनाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी समाजामध्ये येवू घातलेल्या तंत्रज्ञानाशी मैत्री करून नवीन संशोधनाची निर्मिती केली पाहिजे.’ यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे व डॉ.संदीप वांगीकर यांनी देखील मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा दोन दिवस चालली असून यामध्ये विमान बनविण्याचे तंत्रज्ञान शिकविले गेले आणि त्याची प्रात्यक्षिकातून चाचणीही घेतली गेली. यावेळी प्रा. दिग्विजय रोंगे, इतर प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. मुस्कान आत्तार व सिद्धेश्वर खपाले यांनी सुत्रसंचालन केले तर पौर्णिमा निकते यांनी आभार मानले.

छायाचित्र- स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 'मेसा' व 'स्कायफी लॅब, बेंगलोर' यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर. सी. एअरक्राफ्ट' या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते त्यातून विमानाचे प्रात्यक्षिक सादर करताना डॉ. डॉ.संदीप वांगीकर, समन्वयक प्रा. संजय मोरे, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी.
0 Comments