स्वेरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची कार्यशाळा संपन्न

स्वेरीज् इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यशाळेचे उदघाटन करताना सोलार इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख सूर्यकांत बांदल सोबत डावीकडून  अंगद बांदल, स्नेहल भोंडवे, विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, डॉ. अभय उत्पात, प्रा. धनराज डफळे, महेश डोंगरे.
Pandharpur Live -
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग व सोलार इलेक्ट्रॉनिक्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘अ सर्टिफिकेट कोर्स इन सोलार टेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.
       दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी यांनी या कार्यशाळेचा नेमका हेतू काय व त्यातून होणारे फायदे सांगितले. सोलार इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख सूर्यकांत बांदल यांनी ‘सौरऊर्जेचे भविष्यात महत्व ओळखुन अनेक उपकरणे यापुढे सौर उर्जेवर चालणार आहेत यामुळे बाजारपेठा उपलब्ध होवून यातून उत्तम व्यवसाय देखील करता येईल’ असे सांगून सौरऊर्जेचे भविष्यात होणारे फायदे नमुद केले. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी अशा प्रेरणादायी उपक्रमांना आपले स्वेरी महाविद्यालय कसे सातत्याने पाठबळ देते याबाबत आणि विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व सोलार इलेक्ट्रॉनिक्स, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार देखील करण्यात आला. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. धनराज डफळे यांनी काम पाहिले. या उपक्रमामध्ये द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या जवळपास ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रा. श्रवणकुमार अकीरेड्डी, प्रा. महेश यड्रामी, प्रा. सुदर्शन उकीरडे, प्रा. अनिल टेकळे, प्रा. स्वप्ना गोड, ऋषी मुधोळ, तेजस सातपुते व विद्यार्थी उपस्थित होते. किशोरी सावंत व साक्षी काळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. प्रशांत मगदूम यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments