सिंहगड मध्ये राज्यस्तरीय ‘डिबेट आणि एसे राईटिंग’ स्पर्धा संपन्न


सिंहगड मध्ये "डिबेट आणि एसे राईटिंग स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी मान्यवर
Pandharpur Live- 

     पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात "इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग स्टुडंट असोसिएशन" (ईसा) यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘डिबेट आणि एसे राईटिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


       

     या स्पर्धेचे उदघाटन प्रा. सोमनाथ ठिंगळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या स्पर्धेसाठी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील १०० हून अधिक स्पर्धेक सहभागी झाले होते. सहभागी व विजयी स्पर्धेकांना महविद्यालयाच्या वतीने रोख स्वरूपात बक्षीस आणि प्रमाणात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

    पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ईसा म्हणजे "इलेक्ट्रिकल स्टुडंट असोसिएशन" यांच्या वतीने राज्यस्तरीय "डिबेट आणि एसे राईटिंग" स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयातुन १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी तसेच विविध गुणात्मक दर्जा मिळविण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
     ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील ईसा शिक्षक प्रतिनिधी प्रा. लोकेश स्वामी सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन महेश जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments