सिंहगड मध्ये 'काँक्रिंट क्वालिटी कंट्रोल इन हाय-वे वर्क्स' या विषयावर व्याख्यान


पंढरपूर सिंहगड मध्ये आयोजित केलेल्या चर्चा सञात सहभागी विद्यार्थी.
Pandharpur Live Online - 

पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन.  सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय व अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  'अल्युमीनी इंटरँक्शन सेशन' या महाविद्यालयाच्या उपक्रमांअंतर्गत 'काँक्रिंट क्वालिटी कंट्रोल इन हाय-वे वर्क्स' या  विषयावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या जी.आर. इफ्रा प्रोजेक्ट्स प्रायवेट लिमिटेड; अहमदाबाद या कंपनीत क्वालिटी कंट्रोल इंजीनिअर म्हणून कार्यरत असलेले अक्षय सरडे यांचे चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले होते.


या सत्राच्या प्रारंभी अक्षय सरडे  यांचे स्वागत व सत्कार सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे प्रा. चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते व प्रा. श्रीगणेश कदम, प्रा.यशवंत पवार, प्रा.गणेश लकडे, प्रा.अमोल कांबळे , प्रा.संगमनाथ उप्पीन यांच्या उपस्थितीत  करण्यात आले.
                या सत्राची सुरुवात करताना अक्षय सरडे म्हणाले कि, माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाचे उदिष्ठे पुर्ण करण्यासाठी  'सिंहगड-पंढरपूर' मधील टिचींग लर्निंग पध्दती व येथील प्राचार्य कैलाश करांडे यांच्यासह सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेत असलेल्या श्रमाचे चीज करण्याची संधी माझ्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांना मिळत आहे.
ते पुढे म्हणाले कि,सिव्हील इंजिनियरींग क्षेत्रातील कोणत्याही कामांमध्ये काँक्रीट हा एक खूप महत्वाचा घटक आहे आणि एखाद्या प्रकल्पामध्ये जवळजवळ ७५ ते ८०%  कामांमध्ये काँक्रिट चा वापर होतोय. म्हणून त्याची क्वालिटी (गुणवत्ता) सुध्दा चांगली असणे गरजेचे आहे.
काँक्रिट क्वालिटी विषयी बोलताना त्यांच्या कडे सध्या असलेल्या जबाबदारींबद्दल व प्रत्यक्ष काम करत असताना येत असलेल्या अडचणी व अशा समस्यावर मात करण्यांसंदर्भात   व्यापक उहापोह केला.

या सत्राचे समन्वयक म्हणून प्रा. गणेश लकडे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर प्रा. संगमनाथ उप्पीन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments