यशस्वी विद्यार्थ्यासमवेत प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर व कला शिक्षक नारायण कुलकर्णी
पंढरपूर लाईव्ह- महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेमध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या परीक्षेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन चा निकाल शंभर टक्के लागला असून या एलिमेंटरी परीक्षेमध्ये आर्यन विजयकुमार कराळे ए-ग्रेड, श्रद्धा सोमनाथ गाजरे बी-ग्रेड, प्रणिता नवनाथ गोरे बी-ग्रेड, अद्वैत संतोष माने बी-ग्रेड, श्रवण देविदास नागणे बी-ग्रेड तर मधुरा रविंद्र शिंदे बी-ग्रेड मिळवून चित्रकलेमध्ये यश संपादन केले.
0 Comments