“कर्मयोगी इंजिनिअरींग मध्ये शिक्षणातील संधी या विषयावर करिअर पत्रिका ठाणे या कार्यशाळेचे व्याख्यान संपन्न”



Pandharpur Live-
कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे व करिअर पत्रिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी इंजिनिअर
कॉलेज शेळवे, ता. पंढरपूर येथे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2020 रोजी शिक्षणातील संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करिअर पत्रिका ठाणे येथील प्रसिद्ध व्याख्याते श्री पंकज तावडे व कृपाली सोनागेला यांनी केले. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, सर्व विभागप्रमुख आदी मान्यवर तसेच कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी या वक्यांनी इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या संधी तसेच परदेशातील शिक्षणाच्या संधी याबद्दलची माहिती दिली. यावेळी ही कार्यशाळा विभाग निहाय घेण्यात आली.

प्रमुख वक्त्यांचा स्वागत व सत्कार कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी केला. याप्रसंगी प्राचार्यांनी सर्व
विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना शैक्षणिक विकास करताना स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे गेले पाहिजे व त्याची पूर्वतयारी सातत्याने कशी करता येईल याचे मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तावडे व सोनागोला यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल कॉलेजच्या प्राचार्यांचे मनःपुर्वक आभार मानले. या कार्यक्रमास प्रथम वर्ष ते अंतीम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व समालोचन सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.बाबर ए.टी.यांनी केले
तर आभार प्रदर्शन कम्प्युटर सायन्स एंड इंजिनिअरींग चे विभाग प्रमुख प्रा. कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमास कॉलेजचे उपप्राचार्य मुडेगावकर, प्रा. देशमाने, प्रा.भोसले, प्रा.सुतार, प्राध्यापिका.जाधव प्रा. हलचेलीकर व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ – कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख व्याख्याते श्री तावडे व सोनागोला मॅडम
तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी.

Post a Comment

0 Comments