“कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा”



 Pandharpur Live-
गुरुवार, दिनांक २७/०२/२०२० रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये मराठी दिन उत्साहात साजरा केला
गेला. यामध्ये प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी मराठीचे महत्त्व आपल्या शब्दातून विद्यार्थ्यांना सांगितले. मनोगत व्यक्त करताना प्राचार्यांनी “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी जाहलो मराठी, खरेच धन्य ऐकतो मराठी या पंक्तीने मराठी दिनाची सुरुवात केली.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली मायबोली म्हणजेच मराठी, मराठीचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे.

प्रदेशाच्या ११ कोसावर मराठी बोलण्याची पद्धत बदलली जाते तरीसुद्धा ही भाषा वैविध्यतेने नटलेली आहे. याच
मराठी भाषेच्या प्रेमामध्ये अनेक कवी, लेखक वेडे होऊन त्यांनी विविध प्रसिद्ध कविता, लेख लिहल्या आहेत. यात अगदी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्यापासून ते आजच्या पिढीच्या कवी संदीप खरे यांनी भाषेचे सौंदर्य आपल्या काव्यांनी वृद्धिंगत केले आहे. भाषा ही आपल्याला समृद्ध करते व भाषेमुळे आपल्यात संस्कार रुजु होतात.

कार्यक्रमाप्रसंगी कला सादर करताना इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ओव्या, पोवाडे, शब्दकोडे
त्याचबरोबर कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांची माहिती कविता व मराठी गीताद्वारे सादर केली. तसेच बाल सभेतून विद्यार्थ्यांनी भाषेचे वैविध्य दाखवले. यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर करत प्लास्टिकचे दुष्परिणाम मांडले व महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती सांगितली.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक मा. आमदार प्रशांत परिचारक या मराठी दिनानिमीत्त सर्व विद्यार्थ्यांना व
शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्या सौ शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांचेही यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. मराठी शिक्षिका योगीनी ताठे व संध्या जाधव आणि प्रशालेच्या शिक्षकांनी मुलांना यावेळी सहकार्य केले. या मराठी दिनाचा विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे आस्वाद घेतला.

Post a Comment

0 Comments