पंढरीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक महेश बेणारे यांचे दुःखद निधन

पंढरपूर लाईव्ह वृत्त-
पंढरीतील आस्था कलेक्शन चे संचालक, सुप्रसिद्ध व्यावसायिक महेश प्रल्हाद बेणारे (वय 45), रा. बेणारे गल्ली, पंढरपूर यांचे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात 2 मुले, पत्नी असा परिवार आहे.

आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजते.

महेश बेणारे हे एक कुशल व्यावसायिक असण्यासोबतच  अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. पंढरीत त्यांचा खुप मोठा मित्रपरिवार असुन त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपूर लाईव्ह कडून भावपुर्ण श्रध्दांजली. 

Post a Comment

0 Comments