पंढरपूर- पालवीत बक्षिस वितरण


Pandharpur Live- 
पालवी ज्ञानमंदिर प्रशालेमध्ये चित्र रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना जेष्ठ चित्रकार विजयेंद्र जोशी
पंढरपूर-  पालवी ज्ञानमंदिर प्रशालेच्यावतीने चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर शहर व तालुक्यातील सतरा शाळांमधील सुमारे साडेचार हजार विद्याथ्यारनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या विद्याथ्यारना येथील जेष्ठ चित्रकार विजयेंद्र जोशी, भारत गदगे, भारत
माळी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

शालेय विद्याथ्यारच्या कलागुणांना वाव मिळावा व पालवी संस्थेचे कार्य सर्वसामान्यांपर्यत ज्ञात व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती पालवीच्या संस्थापिका मंगलताई शहा यांनी दिली. एकुण नव्वद विजेत्या विद्याथ्यारना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट ्रॉफी व प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्यात आले. तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले. 

या स्पर्धेचे परिक्षण कला शिक्षक विलास जोशी, अमित वाडेकर, सचिन देशपांडे, गणेश पुंडेकर यांनी केले. या कार्यक्रमास विविध शाळांमधील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान पालवीतील बालकांनी सादर केलेल्या देशभेीपर नृत्यास उपस्थित सवारनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालवी ज्ञानमंदिर प्रशालेतील सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिवा डिंपल घाडगे व वृषाली काळे यांनी केले. सुत्रसंचालन स्वाती आराध्ये यांनी
केले. श्री.गुंड सरांनी आभार मानले. आपले

Post a Comment

0 Comments