पुणे येथील संगीत विकास सभा संस्थेचे अध्यक्ष पं. विकास कशाळकर यांची नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अध्यक्ष पदी नेमणूक झाली असून उपाध्यक्षपदी पं. पांडुरंग मुखडे कोषाध्यक्ष डाँ.किशोर देशमुख सचिव बाळासाहेब सूर्यवंशी सदस्य म्हणून बाळकृष्ण विभुते. राम नारायण. डॉ.देवेंद्र कुलकर्णी. प्रभाकर भांडारे. जमिनीकांत मिश्र .गणेश राम बरेठ. संध्या देशमुख यांची एकमताने निवड झाली असून पं.विकास कशाळकर यांची प्रसिद्ध गायक आणि असंख्य विद्यार्थी घडवणारे गुरु म्हणून ओळख आहे.
पंढरपूर येथे त्यांच्या नावाने पं. विकास कशाळकर फाउंडेशन गेली दहा वर्ष शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करते आहे.त्यांना त्यांचे वडील ना. द. कशाळकर यांच्याकडून सांगीतिक वारसा लाभलेला आहे. घरातच सांगीतिक तालीम लाभलेल्या डाँ.कशाळकर यांना ज्येष्ठ गायक व विख्यात शास्त्रीय व्हायोलीनवादक पं. गजानन जोशी म्हणून गुरू लाभले. आपल्या संगीत विकास सभा संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले क्रिएटिव्हिटी इन म्युझिक या विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे.त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे प्रधाना आचार्य म्हणून जबाबदारी समर्थपणे सांभाळली असून शालेय संगीत अध्यापक बालचित्रवाणी यामध्ये दीर्घकाळ निर्माते मुंबई येथे दूरदर्शनवर काही काळ सेवा करुन भगवान श्री महावीर यांच्या जीवनावर आधारित नृत्य संगीताची निर्मितीही केली आहे. त्यांनी विविध ठिकाणी आपले शास्त्रीय गायन सादरीकरण केले आहे. त्यांनी संत यांच्या जीवनावर आधारित ऊस डोंगापरी हे नाटक लिहिले असून त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट. पीएचडी. संगीत विशारद .संगीत अलंकार. अशा अनेक पदव्या प्राप्त केल्या आहेत.तसेच ते पूर्ण जगात विविध देशात सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन करतात तसेच चर्चासत्र सांगीतिक कार्यशाळा व्याख्याने आणि संगीत मैफिली अनेक ठिकाणी होऊन त्यांचा ज्ञानाचा वापर ते सर्व विद्यार्थ्यांना करत असतात. अशा या पं. विकास कशाळकर यांची गांधर्व महाविद्यालयामध्ये अध्यक्षपदी नेमणूक झाल्याने संगीत क्षेत्राला निश्चितच चांगले दिवस येतील अशी खात्री वाटते.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय केवळ सांगीतिक विषय अध्यापन व परीक्षे पुरता मर्यादित न ठेवता सांगीतिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाच्या संशोधनाला वाव दिला जाईल. या क्षेत्रात संशोधन करणार्यांना सर्वतोपरी मदत करण्यावर आमचा भर राहील. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय ला यूजीसी मान्यता मिळवून देण्यास प्राधान्य राहील पं. विकास कशाळकर.

0 Comments