Pandharpur Live-
पंढरपूर- मराठी साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक, प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त स्वेरीत ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात आला.
प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. यशपाल खेडकर यांनी ‘मराठी भाषा दिवसा’चे महत्व विशद करताना ‘कुसुमाग्रजांच्या मराठीतील साहित्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेर देखील मराठी भाषेला महत्व प्राप्त झाले असून कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातील लेखनातून मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहचवली आहे. आज मातृभाषेमुळेच भाषेची गोडी निर्माण होवून मनातील भावना अधिक उत्कट करता येतात. जागतिक ज्ञान भाषेतील इंग्रजी व मराठी यांच्यातील दरी कमी होणे आवश्यक असून मराठी भाषा अधिक समृद्ध झाली पाहिजे.’ यावेळी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘मराठी भाषेचे महत्व’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. भुवनेश्वरी मेलिनामठ, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, डॉ. व्ही.एस. क्षीरसागर, ग्रंथपाल सतीश बागल, प्रा. दिग्विजय रोंगे, इलेक्ट्रीकल सुपरवायजर संतोष जाधव, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी आभार मानले.


0 Comments