पंढरपूर सिंहगडचे विद्यार्थी किल्ले स्वच्छता करताना
Pandharpur Live-
पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून भूषणगड व अजिंक्यतारा गडाची स्वच्छता दि. २१ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. ५० विद्यार्थ्यांनी
१९ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली होती. या नंतर २१ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मोहसिन तांबोळी यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ४१ विद्यार्थी भूषणगड व अजिंक्यतारा गडावर जाऊन तेथे स्वच्छता करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी किल्ले स्वच्छता करून सामाजिक उपक्रम घेतले आहेत. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, मोहसिन तांबोळी सह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.



0 Comments