गळीत हंगाम चालू असणारे साखर कारखान्यातील साखर कामगार यांना पुरेशा सुविधा पुरवा- अविनाश कुटे पाटील


नेवासा :- पुणे ,सांगली, कोल्हापुर परिसरात काही साखर कारखाने चालू आहेत.गळीत हंगाम अंतिम टप्पात असल्याने शेतकरी बांधवाचे नुकसान होवू नये म्हणून साखर कारखाने चालू असल्याचे समजते.

करोना परस्थिति पहाता अनेक ठिकाणी गळीत हंगाम बंद झालेले साखर कारखाने व अनेक कंपनीज व कार्यालये यांना 31 तारखे पर्यत काम बंद ठेवून रजा दिलेल्या आहेत.परन्तु जे साखर
 साखर कारखाने चालू आहेत.अशा साखर करखान्यात अनेक कामगार काम करतात.तिथे सुरक्षाच्या दृष्टिने पुरेशा सुविधा, हात धुन्यासाठी कामाच्या जागी प्रत्येक ठिकाणी  सँनीस्ट्रेराझेशन/साबन,शिफ्ट वाइज मास्क ,डेटॉल,सुरक्षीततेची साधने किमान एका शिफ्ट मधून चेकिंग डॉक्टर आदि सुविधा तातडीने पुरविनेसाठी मा. शासन तथा साखर आयुक्त यांनी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नेवासा येथील शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध एक परिवाराचे अविनाश कुटे पाटील यांनी केली मुख्यमंत्री व साखर आयुक्त यांचेकड़े मेलद्वारे केली आहे.