पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११२ वरून ११६ वर पोहोचली आहे. आज सांगलीतील इस्लापूर येथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आहे. तर मुंबईत आणखी चार करोना रुग्ण आढळले आहेत. या चार रुग्णांना प्रवास इतिहास अथवा संसर्गातून करोनाची लागण झाली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. तसंच यापैकी १४ बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये असल्याचं देखील आरोग्यमंत्री यांनी सांगितलं आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असुनही नागरिक मात्र याबाबत खबरदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. या रोगाचे गांभीर्य ओळखून लोकांनी योग्य ती खबरदारी घेणं अत्यावश्यक बनलं आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 झाली आहे.आज सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत व मुंबई येथे 4 सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत.
यापैकी 14 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.
176 people are talking about this
सांगलीत कुटुंबातील पाच जणांचा करोना लागण झालेल्यांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एक लहान मुलीचा समावेश असल्याच समोर आलं आहे.
आतापर्यंतची राज्यातील करोनाग्रस्तांची आकडेवारी
मुंबई शहर आणि उपनगर - ४५
पिंपरी चिंचवड मनपा - १२
पुणे मनपा - १९
नवी मुंबई - ५
कल्याण - ५
नागपूर - ४
यवतमाळ - ४
सांगली - ९
अहमदनगर - ३
ठाणे - ३
सातारा - २
पनवेल- १
उल्हासनगर - १
औरंगाबाद - १
रत्नागिरी - १
वसई-विरार - १
पिंपरी चिंचवड मनपा - १२
पुणे मनपा - १९
नवी मुंबई - ५
कल्याण - ५
नागपूर - ४
यवतमाळ - ४
सांगली - ९
अहमदनगर - ३
ठाणे - ३
सातारा - २
पनवेल- १
उल्हासनगर - १
औरंगाबाद - १
रत्नागिरी - १
वसई-विरार - १