पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या सर्वत्र कोरोना विषाणुमुळे भीतीचे सावट आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू झालीय. परंतु विविध शहरात कामधंद्यानिमित्त आलेल्या मजुरांची, बेघरांची व निराश्रीतांची मात्र उपासमार होताना आढळत आहे. पंढरी नगरीतही अशा अडकुन पडलेल्या शेकडो लोकांची बिकट अवस्था आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात आजही असे शेकडो लोक आकाशाचे पांघरुन आणि वाळवंटाचे अंथरुण करुन उघड्यावर दिवस काढत आहेत. या अडकुन पडलेल्या लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा संकल्प कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी केलाय. आज त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटातील व विविध घाट परिसरातील निराधार, बेघर, मजुर अशा शेकडो लोकांना चपाती व दाळकांदा असे सुग्रास भोजन दिले. यावेळी अनेक महिला भगिणींनीही यथेच्छ भोजन केल्याचे दिसुन आले.
यावेळी प्रसाद (भैया) कोळी, नागेश बाबा नेहतराव, सचिन देशमनाने, गणेश तारापूरकर, तुषार माने, सचिन नेहतराव, अप्पा करकमकर, बबलु बोराळकर, महेश वाघमारे, संतोष कोळी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अशा प्रकारे कोळी महासंघाच्या वतीने दररोज निराधार, निराश्रीत, बेघरांना एकवेळचे जेवण देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बोलताना अरुणभाऊ कोळी यांनी दिली.