Pandharpur Live- कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये पंढरपूर शहरातील विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे अत्यावश्यक असल्याने पंढरपूर नगरपरिषदेमार्फत फवारणी सुरु आहे. परंतु यासाठी ब्लोअर मशीन्सची कमतरता भासत होती. यासाठी नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी स्वखर्चाने 16 ब्लोअर मशीन उपलब्ध करुन दिले. यामुळे आता शहरातील विविध भागात वेगाने फवारणी करण्यात येत आहे.
पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन युद्ध पातळीवर निर्जंतुकीकरणाकरिता अग्निशामक टँकर, 12 हातपंप, 3 ब्लोअर मशीनद्वारे फवारणी करण्याचे काम नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले होते. परंतु शहराची हद्द विचारत घेता सदर यंत्रणा कमी पडत होती म्हणुन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी स्वत:च्या खर्चाने 16 ब्लोअर मशीन पंढरपूर नगरपरिषदेला उपलब्ध करुन दिल्या.
संपुर्ण शहरातील प्रभागात निर्जंतुकीकरणाकरिता हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, अनिल अभंगराव, नरेंद्र डांगे हे उपस्थित होते.
