कोरोना विषाणु प्रतिबंधासाठी प्रभाग क्रमांक 13 मध्ये अग्निशामक गनद्वारे जंतूनाशक फवारणी


प्रभाग क्रमांक 13 मधील फवारणी दरम्यान कर्मयोगी नगरमध्ये समाजसेवक ओंकार बसवंती व शिवसेना महिला तालुका प्रमुख आरतीताई बसवंती यांनी नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था केली व नगरसेवक प्रशांत शिंदे व आरोग्य कर्मचार्‍यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. 

Pandharpur Live- 
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये ‘हायपोक्लोराईट’ या जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.

पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक प्रशांत शिंदे यांनी प्रभागातील सर्व परिसरात नगरपरिषद आरोग्य विभागाचे कर्मचार्‍यांमार्फत अग्निशामक गनद्वारे ही फवारणी करवून घेतली. कोरोना विषाणुमुळे संपुर्ण जगभरात हाहाकार माजलेला आहे. आपल्या देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. नागरिकांनी शासनाच्या आदेशानुसार संचारबंदीच्या काळात घरातुन बाहेर पडु नये, स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन नगरसेवक प्रशांत शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.