एकीकडे निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींची फाशी पुढे ढकलल्यामुळे देशात नाराजीचं वातावरण असताना आणखी एका भयंकर घटनेने देश हादरला आहे. आसाम येथे एका 11 वर्षांच्या मुलीवर सात जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला असून तिची हत्या करण्यात आली आहे. भयंकर म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे दहावीचे विद्यार्थी आहेत.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आसामच्या बिस्वनाथ जिल्ह्यातील राजाबाडी नावाच्या गावात ही घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थ्यांची शालान्त परीक्षा संपल्याने त्यांनी पार्टी करायचं ठरवलं होतं. त्या पार्टीत त्यांनी पीडित मुलीला फूस लावून बोलवलं. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह जंगलातील एका झाडावर टांगला.
या प्रकरणाने बिस्वनाथ जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणातील सातही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून ते अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी या आरोपींची ओळख जाहीर करावी तसेच त्यांना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणानंतर पीडितेच्या नातेवाईकांसह शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 15 काही काळ ठप्प झाला होता.
0 Comments