Pandharpur Live-
पंढरपूर, दि. 05 :- पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील उजनी कॅनॉलवरील कोसळलेल्या पुलाचे बांधकाम नव्याने सुरु असल्याने या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल दिनांक 3 मार्च ते 15 एप्रिल 2020 कालावधी पर्यंत राहणार आहे. अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर- सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सुपली गावच्या हद्दीतील उजनी कॅनॉलवरील पुलावरील वाहतुकीसाठी कोणताही अडथळा होऊ नये यासाठी अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
पंढरपूर कडून साताराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना सूचना:- पंढरपूर कडून साताराकडे जाणारी अवजड वाहने गादेगांव येथून कोर्टी मार्गे पंढरपूर-कराड रस्त्यावरुन उजवीकडे वळून महुद मार्गे साळमुख येथून साताराकडे मार्गस्थ करावीत अथवा गादेगांव मार्गे बाजीराव विहीर येथून पंढरपूर- पुणे मार्गावरुन वेळापूर चौकातुन साळमुख मार्गे साताराकडे मार्गस्थ करावीत.
सातारा कडून पंढरपूरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना सूचना:- सातारा कडून पंढरपूरकडे जाणारी अवजड वाहने साळमुख येथून महुद मार्गे पंढरपूर- कराड रस्त्यावरुन कोर्टी -गादेगांव मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ करावीत. अथवा साळमुख येथून वेळापूर मार्गे पंढरपूर-पुणे रस्त्यावरुन पंढरपूरकडे मार्गस्थ करावीत.
संबंधीत वाहनधरकांनी या बदललेल्या वाहतुक मार्गाची नोंद घेवून वाहतक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन वाहतुक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments