नगरपरिषद सफाई कर्मचार्यांच्या आरोग्यासाठी विशेष योजना करावी
-आमदार प्रशांत परिचारक यांची विधानपरिषदेत मागणी
पंढरपूर नगरपरिषद सफाई कमचार्यांच्या हितासाठी आमदार प्रशांत परिचारक यांचा आवाज विधानपरिषदेत घुमला. यावेळी पंढरपूर नगरपरिषद कर्मचार्यांच्या आरोग्यासाठी विशेष स्वतंत्र योजना करण्याची मागणी आ. परिचारक यांनी केली. यावर उत्तर देताना वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी आ. परिचारक यांनी चांगला मुद्दा उपस्थित केल्याचे सांगत शासनाच्या धोरणानुसार हा प्रश्न मार्गी लागण्यासाठ्ी बजेटमध्ये एक वेगळी तरतुद करण्यात यावी. जेणेकरून सफाई कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल. असे आदेश दिले.
यावेळी बोलताना ते आ. परिचारक म्हणाले की, पंढरपूर येथे भरणार्या चार वारीमध्ये लाखो भाविक हजेरी लावतात. तर राज्यभरातील विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कोटयावधी भाविक दर्शनासाठी येतात. या सर्वांच्या स्वच्छ्तेचा भार सफाई कामगारांवर पडल्याने त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आहे. सतत घाणीत काम केल्याने त्यांना दमा, कर्करोग, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
महाराष्ट्र् शासनाने या सफाई कर्मचार्यांचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत करावा अथवा त्यांच्या आरोग्यासाठ्ी एक विशेष आरोग्य योजना तयार करावी अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्बारे केली.
तीर्थक्षेत्र पंढ्रपूरच्या अनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्यभरातील सफाई कर्मचार्यांचा महत्वपूर्ण विषय विधानपरिषदेत मांडला. आजपर्यंत केवळ तीर्थक्षेत्रातील अस्वच्छ्तेवर चर्चा होत होती. मात्र येथे काम करणार्या सफाई कर्मचार्यांच्या आरोग्यबाबत मौन बाळगले जाते.
दरम्यान पंढ्रीत भरणार्या चार वार्या व दैनंदिन येणारे भाविक यांची वर्षाकाठी एक कोटी संख्या आहे. वाढ्त्या लोकसंख्येमुळे स्वच्छ्तेचा प्रश्न निर्माण होत असताना दिवसेंदिवस सफाई कर्मचार्यांची संख्या व पदे कमी होत चालली आहेत. यामुळे शहराची स्वच्छ्ता करणे अवघड होत चालले आहे. सफाई कर्मचार्यांची पदे व संख्या वाढ्वावी अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. पंढ्रपूरसह राज्यातील इतर तिर्थक्षेत्राची लोकसंख्या वाढत असून रोज येणार्या भाविकांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. पाच दिवसाच्या आठ्वडयामुळे पर्यटन वाढणार आहे. यातूनच पंढरपूर शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे सफाई कर्मचार्यांवर स्वच्छ्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंढरपूर शहराची स्वच्छ्ता करण्यासाठी केवळ 260 कामगार आहेत.
त्यासाठ्ी कामगारांची पदे व संख्या वाढ्वावी. त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी हे घाणीत काम करतात. त्यांच्या
आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. मात्र ते शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांच्याकडे पांढ्रे
रेशनकार्ड असल्याने त्यांना शासनाच्या आरोग्य योजनेचा लाभ घेता येत नाही.
तरी महाराष्ट्र् शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत नगरपरिषदेच्या सफाई कर्मचार्यांचा
समावेश करण्यात यावा अथवा त्यांच्यासाठी स्वतंत्र आरोग्य योजना तयार करावी, सफाई कर्मचार्यांना
विमा संरक्षण मिळावे. यासह सफाई कर्मचार्यांचा जुन्या निवृत्ती वेतन योजनेत त्यांचा समावेश करावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेत मांडली. यावर उत्तर देताना वैद्यकीय मंत्री अमित देशमुख म्हणाले की, आमदार प्रशांत परिचारक यांनी विधारपरिषदेमध्ये सफाई कर्मचार्यांचा चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. संबंधीत नगरपरिषदेचे अधिकारी, मुख्याधिकारी, आयुक्त असतील या सर्वांना याबाबत आदेश दिले जातील की, शासनाच्या धोरणानुसार हा प्रश्न मार्गी लागण्यासाठ्ी बजेटमध्ये एक वेगळी तरतुद करण्यात यावी जेणेकरून सफाई कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल.
0 Comments