प्रशासनात फेरबदल... सोलापूरसह या 7 जिल्ह्यांना नवे पालक सचिव

Pandharpur Live Online-
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनात फेरबदल करतानाच सात जिल्ह्यांना नवे पालक सचिव दिले आहेत. त्यानुसार उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी  यांच्याकडे  सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला.

वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची गडचिरोली, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांची जालना, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांची परभणी, महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांची अमरावती, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अन्शु सिन्हा यांची मुंबई उपनगर तर मराठी भाषा विकास विभागाच्या सचिव प्रजक्ता वर्मा यांची धुळे जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments