स्वेरीज् फार्मसीमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळावा’ संपन्न


1 स्वेरी फार्मसीचे माजी विद्यार्थी सोबत प्राचार्य व प्राध्यापकवर्ग.
2 स्वेरी फार्मसीमध्ये बी.व डी. फार्मसीच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे उदघाटन करताना प्राचार्य डॉ. अमित गंगवाल व डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे सोबत डॉ. मिथुन मनियार, इस्माईल बागवान, पुष्कराज व्हनमाने, प्रा. रामदास नाईकनवरे.  
Pandharpur Live-
स्वेरीज् फार्मसीमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळावा’ संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील  श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुट संचलित बी. आणि डी. फार्मसीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा स्वेरी फार्मसीमध्ये नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात कोणी प्रशासकिय अधिकारी होते तर कोणी स्वतःच औषध कंपनीची निर्मिती केली होती. काहीजणी गृहिणी झाल्या होत्या. काही मुली पतीला सहकार्य करण्यासाठी जॉब स्वीकारला होता आणि हे सर्वचजण ‘माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने स्वेरी फार्मसीच्या कॅम्पसमध्ये एकत्रित आले होते. काहीजण दोनाचे तीनतीनाचे चार झाले होते तर काहीजण एम.फार्मसी करुन पी.एच.डी. पूर्ण करण्यात गुंतलेले होते. आजमात्र ते सर्वजण स्वेरी कॅम्पसमध्ये आठवणींच्या हिंदोळ्यांवर मनसोक्त झुलत होते.

         कॉलेज जीवन संपल्यानंतर त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आलेले विद्यार्थी देखील जणू  माजी विद्यार्थी मेळावा हा ‘ट्रेडीशनल डे’ आहे की काय ? या जोशात नटून थटून आले होते. ते आपसात चर्चेत गुंतले असतानाच प्रमुख मान्यवरांचे आगमन झाले. फार्मसीच्या पोर्चमध्ये यथोचित स्वागत होत होते.  प्रारंभी  डॉ. मिथुन मनियार यांनी मेळावा आयोजिन्याचा हेतू स्पष्ट केला व महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती दिली.  डी. फार्मसीचा इस्माईल बागवान व बी. फार्मसीचा पुष्कराज व्हनमाने यांना प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर आमंत्रित केले होते. यावेळी व्हनमाने या माजी विद्यार्थ्यांने आपल्या मनोगतातून ‘स्पर्धा परीक्षेच्या संबंधी माहिती दिली व स्वेरीतील शिस्त व केलेले संस्कार याचा खूप फायदा झाला. त्यामुळे येथील अभ्यासू वातावरणाला व उच्चशिक्षित प्राध्यापकांना  आम्ही मनापासून वंदन करतो.’ असे म्हणाले तर काही जणांनी जागतिक स्तरावर रुजवलेल्या शिस्तीचा फायदा कसा होतो हे पटवून दिले. यावेळी प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांनी ‘विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन (संवाद) विरुद्ध विचार स्पष्टताकौशल्य विरुद्ध दृष्टीकोननातेसंबंध विरुद्ध चांगले कामनियंत्रण विरुद्ध सबलीकरणअंमलबजावणी विरुद्ध नियोजनआक्रमकपणाविरुद्ध आग्रहीपणाबोलणे विरुद्ध ऐकणेओळखपत्रे किंवा प्रमाणपत्रे विरुद्ध आत्मविश्वास,  अंगीकृत विरुद्ध नैसर्गिक वर्तणूक व हार्ड वर्क विरुद्ध स्मार्ट वर्क आदी गोष्टीचे महात्म्य उदाहरणांसह पटवून दिले. दिवसभर कॅम्पसमध्ये फिरून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी विविध क्लासमध्ये जावून नोकरी करत असताना आलेला अनुभव व येणारी अडचण’ यावर बहुमोल टिप्स दिल्या.त्यानंतर सर्वांनी आपल्या शिक्षकांनाविविध विभागांना भेटी देवून शिक्षणातील प्रगती जाणून घेतली.त्यानंतर परिसरातील बागेमध्ये अनेक जण जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी विशेष पोज देवून छायाचित्र काढत होते.यामध्ये फार्मसीच्या स्थापनेपासून ते गतवर्षी उत्तीर्ण पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.  हा मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. गंगवाल व डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. प्रा. स्नेहल चाकोरकर व प्रा. मंदाकिनी होळकर यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य प्रा. मांडवे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments