पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने रविवार दि.०८ मार्च २०२० रोजी विठ्ठल अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याकरिता असलेल्या ‘ऋणानुबंध २०२०’ या मेळाव्याचे यंदा अभियांत्रिकी महाविद्यालय,गोपाळपूर या ठिकाणी आयोजन केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
‘ऋणानुबंध २०२० ’या माजी विद्यार्थी मेळाव्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे मनमुराद चर्चा, आपआपसात सुसंवाद, नव्या विचारांबरोबरच जुन्या आठवणींच्या शिदोरीची देवाण घेवाण करणार असून आपण काम करत असलेल्या कंपनीत अथवा नोकरीत येत असलेले अनुभव कथन व असे अनेक भरगच्च कार्यक्रम या मेळाव्यात असणार आहेत. महाविद्यालयातर्फे माजी विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ बी.पी.रोंगे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे यांचेसह इतर पदाधिकारी हे माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. एकूणच सदर मेळावा जुन्या आठवणींना उजाळा देण्यात, गतकाळात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा घेण्यात येणार आहे.
यामध्ये अभियांत्रिकीच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८ पासून ते गतवर्षीपर्यंत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. स्वेरीमध्ये अभियात्रिंकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने विद्यार्थी पुणे, मुंबई, बेंगलोर तसेच भारतातील अन्य प्रमुख शहरांमध्ये व परदेशात स्थाईक झालेले माजी विद्यार्थी देखील मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एकूणच ‘ऋणानुबंध २०२०’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुना चिवचिवाट स्वेरी कॅम्पसमध्ये नव्याने घुमणार आहे. अधिकाधिक विद्यार्थी हे पुणे, मुंबई, हैद्राबाद, बेंगलोरमध्ये स्थायिक झाले असून या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी होता यावे म्हणूनच रविवारी (८ मार्च) याचे आयोजन केले आहे. माजी विद्यार्थी मेळाव्यासंबंधी अधिक माहीतीसाठी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे (मोबा. क्र. ८६९८३०३३८७) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments