Video- पुणे विभागात एकुण कोवीडचे 585 रुग्ण... पैकी आजपर्यंत 68 जणांना डिस्चार्ज... एकुण 50 जणांचा मृत्यु - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती


Pandharpur Live- पुणे विभागात आज 5 वाजेपर्यंत  एकुण कोवीडचे 585 रुग्णांची नोंद झालेली असुन या पैकी आजपर्यंत  68 जणांना डिस्चार्ज दिलाय तर  एकुण 50 जणांचा दुर्दैवी मृत्यु  झाला असल्याची माहिती आज पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलीय. 

एकुण रुग्णांची मृत्यु आकडेवारी
पुणे- 47
सातारा-2 
सोलापूर- 1
आज पुण्यात दिवसभरात 2 मृत्यु, 13 रुग्ण गंभीर आहेत.

पुणे शहरात  एकुण 531 रुग्ण आहेत.  
आज दिवसभरात पुण्यात 68 नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले.
एकुण 442 केसेस अ‍ॅक्टीव्ह आहेत. 42 जणांना डिस्चार्ज दिला असुन 47 जणांचा मृत्यु झाला आहे.

पुणे विभागातील आकडेवारी 
सातारा -11 रुग्णांपैकी दोघांचा मृत्यु झाला असुन एकाला डिस्चार्ज दिला आहे, एकुण 8 अ‍ॅक्टीव्ह केसेस आहेत. 

सोलापूर- 13 रुग्नांपैकी पैकी 1 मृत्यु झाला असुन एकुण 12 अ‍ॅक्टीव्ह केसेस आहेत.

सांगली - 26 रुग्णांपैकी पैकी 25 जणांना डिस्चार्ज दिला असुन 1 अ‍ॅक्टीव्ह केस आहे. 

कोल्हापूर - 6 रुग्ण आहेत. 

 आजपर्यंत 5181 जणांचे सॅम्पल घेतलेले आहेत. पैकी 4947 सॅम्पलचा रिझल्ट प्राप्त झाला आहे. यापैकी  531 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.  पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण शोधुन काढले आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलीय.