Video- पुणे विभागात एकुण 404 कोवीडचे रुग्ण; आजपर्यंत 47 रुग्णांचा मृत्यु- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

Pandharpur Live- 
पुणे विभागात आज 4:30 वाजेपर्यंत एकुण  404 कोवीडच्या रुग्णांची नोंद झालेली आहे; पैकी आजपर्यंत  47  रुग्णांचा मृत्यु- झाला आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलीय. 

एकुण मृत्यु  झालेल्या रुग्णांची आकडेवारी
पुणे- 44 
सातारा-2 
सोलापूर- 1
पुणे ससुन मधील पहिल्या पेशंटचे रिपोर्ट निगेटीव्ह आलेमुळे सदर पेशंटला डिस्चार्ज दिला आहे. 
पुणे शहरात संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एकुण 463 रुग्णांची नोंद झाली आहे.  
पुणे शहर विभागनिहाय रुग्णांची आकडेवारी
पीएमसी -389 
पिंपरी चिंचवड - 46 
ग्रामीण - 28
पुणे शहरात आज एकुण रुग्णसंख्या 378 झाली असुन, 42 जणांना डिस्चार्ज दिलाय तर  44 रुग्णांचा मृत्यु झालाय.

पुणे विभागातील आकडेवारी 
सातारा -11 रुग्णांपैकी दोघांचा मृत्यु झाला असुन एकाला डिस्चार्ज दिला आहे, एकुण 8 अ‍ॅक्टीव्ह केसेस आहेत. 

सोलापूर- 12 रुग्णांपैकी 1 मृत्यु झाला असुन एकुण 11 अ‍ॅक्टीव्ह केसेस आहेत.

सांगली - 26 रुग्णांपैकी  25 जणांना डिस्चार्ज दिला असुन 1 अ‍ॅक्टीव्ह केस आहे. 

कोल्हापूर - 6 रुग्ण आहेत. 

पुणे विभागात एकुण 68 जणांना डिस्चार्ज दिला असुन 11 रुग्ण क्रिटीकल आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलीय.