पुणे विभागात एकुण 177 कोरोना बाधीतांवर उपचार सुरु.. आज नवीन मृत्युची नोंद नाही... पुणे विभागातील कोरोना रुग्णांबाबत व उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची महत्वपुर्ण माहिती

Pandharpur Live- पुणे विभागात आजपर्यंत  कोरोना बाधीतांच्या एकुण 251 केसेस पैकी  52 जणांना डिस्चार्ज दिला आहे., 26  कोरोना बाधीत व्यक्तींचा दुर्दैवाने  मृत्यु झाला आहे, पुणे विभागात कोरोना रुग्णांच्या आज 177 अ‍ॅक्टीव्ह केसेस असुन यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यात आज एकाही नवीन मृत्युची नोंद नसल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलीय. 
Video- पुणे विभागातील कोरोना रुग्णांबाबत 
विभागीय आयुक्तांची माहिती

Video - कोरोना विषाणु पार्श्‍वभुमीवर पुणे विभागातील उपाययोजना संदर्भात विभागीय आयुक्तांची माहिती
पुणे शहरात काल संध्याकाळी 7  ते आज दु. 2 वाजेपर्यंत नवीन 15 केसेस, आज सकाळपासुन पुणे शहरात नवीन मृत्युची नोंद नाही. 4 रुग्ण क्रिटीकल आहेत. यांच्यावर विशेष लक्ष ठेवलेले आहे. पुणे विभागात सातार्‍यात 5, सांगली 4, कोल्हापूर 4, अशी आजची रुग्णसंख्या आहे.  अशी माहितीही विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

प्रशासन आपल्यासाठी काम करत आहे, पोलीस, महसलि, आरोग्य विभाग सेवेत तत्परतेने कार्यरत आहे.  आपल्या सर्वांच्या सहकार्यानं कोरोनावर मात करु. अशी विनंती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज नागरिकांना पुन्हा एकदा केली आहे.