Pandharpur Live Online- मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. अश्या परिस्थितीमध्ये अनके ऊसतोड मजूर अडकून पडले आहेत. दरम्यान या मजुरांना घरी पाठवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
मुंडे म्हणाले, राज्यभरातील ऊसतोड बांधवांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार! ऊसतोड बांधवांनो, घरी परतताना सुखरुप या, प्रशासनाला सहकार्य करा, महिला व लहान बालकांना प्राधान्याने घरी पाठवा.
राज्यातील 38 साखर कारखाने अंतर्गत एक लाख 31 हजार पाचशे ऊसतोड कामगारांना आपापल्या घरी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये ज्या ऊसतोड कामगारांचे 14 दिवस क्वॉरंटाईनचे पूर्ण झाले आहेत. अशा ऊसतोड कामगारांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्या घरी सोडण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.
माझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर!
तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा.
170 people are talking about this


