सोलापूर - महापौर बंगल्यात कोरोनाचा शिरकाव... आमदारांच्या नातेवाईकालाही कोरोनाची लागण... महापालिकेचे 3 अधिकार्‍यांसह 15 हुन अधिक कर्मचारीही कोरोना बाधीत!


Pandharpur Live-  
सोलापूर : शहरात बुधवारी सकाळी कोरोनाचे नवे 40 रुग्ण आढळून आले. यात महापालिकेच्या महापौर व त्यांचे पती आणि शहरातील एका आमदाराच्या बंधूचा समावेश आहे.  याचबरोबर महापालिकेचे तीन अधिकारी आणि 15 हून अधिक कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे नगरसेवक आणि कर्मचारी हादरले आहेत.
   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


 शहरात कोरोना चे एक हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 200 हून अधिक झाली आहे. महपालिकेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना अंगदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांचे अहवाल आले. महापौर बंगल्यात कोरोना घुसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये आणखी अस्वस्थता पसरली.  

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख चार दिवसांपूर्वीच क्वारंटाइन झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महापौर बंगला, देशमुख वाडा या परिसरात प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments