लग्नाचे आमिष दाखवत पंढरीतील महिलेशी विविध ठिकाणी नेऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याचा व मारहाण करत फोटो शेअर करणेची व आत्महत्येची धमकी दिल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत समजलेल्या वृत्त असे की, पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या एका महिलेला भटुंबरे येथील आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी पंढरपूर ,पुणे, चिंचवड या ठिकाणी फिर्यादीचे संमती शिवाय शरीर संबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिला. अशा आशयाची तक्रार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
पंढरपूर शहरातील एका महिलेला भटुंबरे ता. पंढरपूर या गावातील आरोपी नितीन बाबुराव लोखंडे याने लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिलेच्या संमती शिवाय महिलेसोबत शरीर संबंध ठेवले व नंतर लग्नाला नकार दिल्याने महिलेने शहर पोलिसात तक्रार दाखल केली.
सदर महिलेने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्यास आरोपी आत्महत्या करण्याची धमकी देत फिर्यादी महिलेस दोघांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मारण्याची धमकी देत होता. अशा आशयाची तक्रार पिडीत महिलेने दिली असून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झालाआहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे करीत आहेत.


0 Comments