उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप

Pandharpur Live -
नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते किशोरराजे  कवडे यांना प्रमाणपत्र प्रदान 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व या काळात कोरोना संसर्गाची भीती असतानाही जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पॅरामेडिकल विभागाचे तालुका कार्याध्यक्ष किशोरराजे  कवडे यांनी पीपीई किटचे वाटप केले होते.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.   
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

     
या वेळी बोलताना कार्याध्यक्ष किशोर कवडे म्हणाले कि,वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे कोरोना विषाणू विरोधात लढा देताना कशा पद्धतीने दक्षता घेतली याची जाणीव होती.याच विचारातून आपला जीव धोक्यात घालून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता.      
            या वेळी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष मधुकर फलटणकर,युवा नेते विश्वजित (मुन्ना) भोसले, अमित भैय्या शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments