ईगल फौंडेशन कडून प्रमोद बनसोडे यांना कोरोना योद्धा म्हणून विशेष मानपत्र


Pandharpur Live -
मंगळवेढा: प्रतिनिधी
कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मागिल काही दिवसापासून संचार बंदी घालण्यात आली आहे. अशा संचार बंदी च्या कालावधीत व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजातील लोकांच्या समस्या, उपाययोजना याबद्दल निर्भीडपणे वार्ताकंन केल्याबद्दल लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा येथील पञकार प्रमोद बनसोडे यांना ईगल फौंडेशन, खंडाळा, रत्नागिरी येथील सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने "कोविड योद्धा" मानपत्र देऊन गौरवण्यात आले असल्याची माहिती ईगल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास कोळेकर यांनी दिली.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

         कोविड-१९  हा महाभयंकर व्हायरस ने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे. या रोगावर अद्याप औषध उपलब्ध नाही. आपल्या देशात आलेल्या या महाभयंकर संकटावर स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामिण भागातील कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना पेपरच्या माध्यमातून   नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणं, जनता कर्फ्यू, जीवनावश्यक साहित्य वाटप अशा अनेक गोष्टी पञकार प्रमोद बनसोडे यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत.

     स्वतःचा जीव धोक्यात घालून सामान्य नागरिकांची,गोर-गरीबांची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करीत ग्रामिण भागात पञकार प्रमोद बनसोडे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रत्नागिरी, खंडाळा येथील ईगल फौंडेशन या सामाजिक संस्थेने कोविड योद्धा मानपत्र देऊन गौरव केला आहे.

      ईगल फौंडेशनच्या वतीने पञकार प्रमोद बनसोडे यांना कोविड योद्धा मानपत्र देऊन गौरव केल्याबद्दल महात्मा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड येथील चंद्रकांत वाघमारे, जालिंदर साळे, किशोर वाघमारे, संतोष बनसोडे, बाबा वाघमारे आदी सह अनेक नागरिकांनी  प्रमोद बनसोडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments