तिसंगी - प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व असून सरपंचपदासाठी सुरेखा चंदनशिवे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची सरपंचपदी एकमताने बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी मुजावर एस ए यांनी केली.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
परंतु उंबर गाव येथील सरपंच पद जानेवारी महिन्यापासून लॉक डाऊन असल्यामुळे रिक्त होते. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच बाळासाहेब चंदनशिवे हे पाहत होते . सदरची सरपंच निवडी तलाठी व्यवहारे ए आर, ग्रामसेवक मुकरे पी पी, तसेच पोलिस पाटील सुरेश पवार, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चंदनशिवे, लहू पवार, मालन चव्हाण, सारिका पवार, सविता पवार इ.उपस्थित पार पडली.
या निवडीच्या वेळी माणिक पवार, अशोक चव्हाण, अजित पवार, गोपीनाथ पवार,प्रमोद चंदनशिवे,प्रभू भोसले, शिवाजी चंदनशिवे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.सुरेखा चंदनशिवे यांची सरपंच पदी निवड झाली म्हणून माजी आमदार सुधाकर पंत परिचारक , आमदार प्रशांत राव परिचारक, युरोपियन चे अध्यक्ष उमेशजी परिचारक यांनी अभिनंदन केले


0 Comments