प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढ शुध्द देवशयनी एकादशी सिंपन्न होणार आहे. 1 जुलै 2020 रोजी आषाढी एकादशी च्या दिवशी पहाटे 2:20 वाजता श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापुजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मानाचे वारकरी यांचे हस्ते सपत्नीक होणार आहे. अशी माहिती श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या वतीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
मंदिर समितीच्या दि. 2 जुन 2020 रोजीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार 11 जुन रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शासकीय महापुजेस सपत्नीक येण्याचे निमंत्रणपत्र मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे स्वाक्षरीने ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

0 Comments