पंढरपूर तालुका कोरोना रिपोर्ट- आज पंढरपूर शहरात वास्तव्यास असलेला एकही रुग्ण नाही... तिघेजण कोरोनामुक्त


Pandharpur Live- 
आज पंढरपूर शहरात सद्यस्थितीत वास्तव्यास असलेला एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आलेला नाही. 1 कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आलाय तो पंढरपूरमध्ये वास्तव्यास नाही. सदर रुग्ण जो मुळचा राजपुत गल्ली, जुनी रेल्वे लाईनजवळ, पंढरपूर येथील आहे; परंतु सध्या तो बोरामणी येथे वास्तव्यास आहे. 

आज 3 कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. सद्यस्थितीत एकुण 27 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील 16, ग्रामीणमधील 6 व इतर तालुके व जिल्ह्यातील 5 जनांचा समावेश आहे. आज गजानन महराज मठातील 46 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 


अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिलीय.


Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019