पंढरपूरकरांना मोठा दिलासा- प्रांताधिकारी सचिन ढोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांचेसह 38 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह!


Pandharpur Live-   पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेस एक खुप मोठी दिलासादायक माहिती आज प्राप्त झाली आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणारे व ज्यांच्या प्रयत्नामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. असे प्रांताधिकारी सचिन ढोले व वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांचा कोरोनाचा अहवाल आज निगेटीव्ह आला आहे. त्यांच्यासह आज हाती आलेले 38 जणांचे कोरोना रिपोर्ट हे निगेटीव्ह आलेले आहेत. आज या दोन अधिकार्‍यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने प्रशासनासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. आजतागायत पंढरपूर शहर व तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या 27 एवढी आहे. 
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019

दरम्यान आणखी 4 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे. यामध्ये कांही डॉक्टरांचाही समावेश असल्याचे समजते. प्रांताधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या रिपोर्टची सर्वांनाच प्रतिक्षा लागुन राहिली होती. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यांनी आजतागायत केलेली कामगिरी प्रशंसनीय अशीच आहे. व यापुढेही त्यांच्या कार्याची गरज तालुक्याला आहे.