Pandharpur Live- पुणे, दि. 3 - मानवजातीने यापूर्वी गोवर, कांजण्या पोलिओ इत्यादीच्या विषाणूंवर मात केली आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूवर देखील लवकरच औषध सापडेल आणि आपण त्यावर मात करु, असा आशावाद पुना हॅास्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ईश्वर झंवर यांनी व्यक्त केला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागांतर्गत वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंबईच्या नायर रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ.हेनल शाह सहभागी झाल्या होत्या. विविध विभागांचे सुमारे १०० अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यात पत्र सूचना कार्यालय, रिजनल आउटरीच ब्यूरो, आकाशवाणी, दूरदर्शन आणि फिल्म डिवीजन यांचा समावेश होता.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
कोविड-१९ विषाणू सुपर स्प्रेडर आहे. आजपर्यंत त्यावर कोणेतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही आणि आतापर्यंत केवळ सहायक उपचारच देण्यात येत आहेत. लस आणि औषध निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत, असा विचार करुन आपण आत्मसंतुष्ट राहू नये. मास्कचा वापर, ६ फूट अंतर राखणे, हात धुणे इत्यादीबद्दल सरकार आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ.झंवर यांनी साबण आणि पाण्याने हात धुणे किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरचा वापरास ब्लो ड्रायिंग किंवा अतिनील दिव्याकडून निर्जंतुकीकरण पर्याय नाही. आहारात लसणीचा वापर, मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ धुणे किंवा तिळाचे तेल लावणे विषाणूला दूर ठेवण्याचे खात्रीलायक उपाय नाहीत.
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याविषयी डॉ.झंवर म्हणाले, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक असणे चांगले आहे. परंतु आपण कोविड-१९ विरुध्द प्रतिबंधात्मक उपाय म्हणून याचा गोंधळ घालू नये. मास्कचा वापर, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे.
डॉ. हेनल शाह म्हणाल्या, आरोग्य संप्रेषणात माध्यमांची भूमिका चुकीची माहिती रोखणे आणि सुरक्षित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रसिध्द करणे आहे. वार्तांकनाची भाषा भीती, लाज अपराधीपणाची भावना निर्माण करणारी असू नये. महामारीसाठी कुणीही सज्ज नव्हते. आपण सर्वांनी वेगाने बदल केले. आरोग्याच्या पायाभूत सुविधामध्ये कमी अवधीतच अनेक बदल घडून आले.
महासंचालक डॉ. मनीष देसाई यांनी धारावी एक यशस्वी मॉडेल बनले आहे. त्या मॅाडेलच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखता येईल, असे सांगितले. आरओबीचे संचालक संतोष अजमेरा यांनी आभार मानले. त्यांनी कोविड-१९ विरोधातील लढाई जिंकण्यात जनसंवादाचे महत्व अधोरेखित केले.

