अखेर कोरोना रूग्ण 50 हुन अधिक झाले... कोरोनामुक्त झालेल्या पंढरी नगरीला कोरोनाचा विळखा!


पंढरपूर (प्रतिनिधी) कोरोनामुक्त झालेल्या पंढरी नगरीला कोरोनाचा विळखा पडलाय. शहराच्या चौफेर रूग्ण आढळून आले आहेत.  प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून पंढरपूर शहर कोरोनामुक्त केले होते परंतु आज तालुक्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 50 पेक्षा जास्त झाल्याने रूग्णांचा हा चढता आलेख प्रशासनासह पंढरपूरकरांची चिंता वाढवणारा आहे. 

आज शहरात पुन्हा नवे 4 रुग्ण आढळून आले आहेत.  झेंडे गल्लीत 1, रोहिदास चौकात 2 आणि मंदिर परिसरात 1 असे 4 रूग्ण आढळून आले आहेत. आता तालुक्यातील एकुण रूग्णसंख्या 53 एवढी झाली आहे. 

कोरोना- चिंता नको, खालील प्रमाणे काळजी घ्या!


बाहेर पडल्यावर सॅनिटायझर,  मास्क चा वापर करा.


गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाऊच नका.


इतरांपासुन सुरक्षित अंतर ठेवा.


बाहेरून घरात आल्याबरोबर हात साबणाने स्वच्छ धुवून घ्या.


शक्यतो वारंवार आपल्या तोंडाला, डोळ्यांना व नाकाला स्पर्श करणे टाळा. 


घरातील वयोवृद्ध मंडळी आणि लहान मुलांना घराबाहेर पाठवु नका. 


प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घ्या. 


प्रशासकीय नियमांचं पालन करा.


स्वतः जर कोरोना रूग्णांच्या संपर्कात आला असाल तर ही गोष्ट लपवुन न ठेवता तातडीने स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्या.


कोरोनाची लक्षणं जाणवत असल्यास तपासणी करून घ्या. 

डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य ती खबरदारी घ्या.


Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019