इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पल्स चा पदग्रहण समारंभ 14 जुलै मंगळवार रोजी रेपाळ यांच्या घरी दुपारी चार वाजता अगदी साध्या पद्धतने पार पडला. जागतिक महासंकट करोनामुळे फक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
नूतन अध्यक्ष रेपाळ, व्हाईस प्रेसिडेंट सारिका कासार, सेक्रेटरी डॉक्टर सायली लाड, ISO स्वप्नल गाडे ,खजिनदार प्रिया सोनवणे, एडिटर पल्लवी उपाध्ये यांनी पदभार स्वीकारला तसेच जयलक्ष्मी माने नीलिमा गोसावी, चैताली कवडे प्रियंका भांडेकर, हे एक्झिक्युटिव्ह मेंबर, पास्ट प्रेसिडेंट स्वाती भगरे व गौरी गोसावी ही टीम उपस्थित होती. पूर्णपणे सोशल डिस्टंसिंग सांभाळून हा कार्यक्रम पार पडल्याची माहिती नुतन अध्यक्ष रेपाळ यांनी दिली.
यावेळी गरजूंना आर्सेनिक ३० या गोळ्यांचे वाटप केले आणि एका गरजू कुटुंबाला महिन्याचे धान्य देण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व मेम्बर्सला हा कार्यक्रम पाहता यावा म्हणून सर्व कार्यक्रम युट्युब लाईव्ह केला गेला. करोना संक्रमणाच्या धोक्यामुळे या वर्षी जास्तीत जास्ती प्रोजेक्टस ऑनलाईन होतील असेही या वेळी अध्यक्षा विद्या रेपाळ यांनी सांगितले.
या वर्षी आर्थिक मंदी मुळे येणाऱ्या धोक्याची जाणीव ठेऊन काय काय काळजी घ्यावी लागेल आणि समाजासाठी आपले सहकार्य किती मोलाचे असेल हेही त्यांनी बोलून दाखवले.
नूतन संपादक पल्लवी उपाध्ये यांनी बुलेटीन चे प्रकाशन केले. प्रिया सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सर्वात शेवटी डॉक्टर सायली लाड यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

