श्रीविठ्ठलाच्या प्रक्षाळपुजेसंदर्भात मंदिर समितीकडून सखोल चौकशीचा निर्णय... पुजेसाठी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना मंदिर प्रवेश बंदी


आषाढी यात्रा 2020 मध्ये श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा दि. 9-7-2020 रोजी संपन्न झाली, या पुजेबाबतीतील रुढी व परंपरेनुसार सदरची प्रक्षाळपुजा झाली किंवा कसे याबाबत आज श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर ची विशेष सभा समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ज्ञानेश्‍वर महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

या सभेमध्ये सदर प्रक्षाळपुजेसंदर्भात सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन पुजेसाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याचबरोबर संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना चौकशी पुर्ण होईपर्यंत मंदिरात व देवाच्या गाभार्‍यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

याबाबत मंदिर समितीकडून एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments