पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
लव इन रिलेशन शिपमध्ये सोबत राहत असलेल्या स्वतःच्याच गर्भवती प्रेयसीचा गळा दाबून खुन केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि, "मला फाशी द्या!" अशी मागणी केल्याची धक्कादायक घटना घडलीय. शिरुर तालुक्यातील कारेगाव इथं हे घडल्याचं समोर आले आहे. याठिकाणी लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने शरीरसंबंधाच्या वेळी झालेल्या वादातून गरोदर प्रेयसीचा खून केला.
डिप्रेशनचा पेशंट असलेल्या या व्यक्तीनं रागाच्या भरात हा थरार केल्याचं समोर आलंय. आरोपी आपल्या प्रेयसीसोबत कारेगाव येथील फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. खून केल्यानंतर आरोपीनं स्वतः येऊन हा घटनाक्रम पोलिसांना सांगितल्यानं पोलिस ठाण्यातही एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक व्यक्ती भेदरलेल्या अवस्थेत रांजणगाव पोलिस ठाण्यात आला. पोलिसांनी या व्यक्तीला नाव विचारलं असता आपलं नाव त्यानं किरण फुंदे ( रा. राजगड प्लाझा) असं सांगितलं. मात्र पोलिस ठाण्यात का आला आहेस असा सवाल पोलिसांनी विचारला असता त्यानं पोलिसांकडे अचानक एक कोरा कागद आणि पेनची मागणी केली.
आरोपीला कागद अन् पेन मिळताच त्यानं कागदावर सर मी टेंशन डिप्रेशनचा पेशंट आहे. आणि अशा अवस्थेत माझ्याकडून एक खून झालाय. मी माझ्या गर्लफ्रेंडचा गळा दाबून जीव घेतला असून कृपया मला फाशी द्या' असं लिहून ते पत्र त्यानं चक्क पोलिसांना दिलं. एवढंच नव्हे तर रुमला बाहेरून लाॅक लावून आल्याचं सांगत रूमची चावीदेखील पोलिसांना दिली.
सदर घटनेची पाहणी केली असता पोलिसांना रूममध्ये 24 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला. आरोपीकडे अधिकचा तपास केला असता त्यानं सांगितलं की, चार महिन्यांपासून आम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असून प्रेयसी स्वखुशीच्या संबंधातून गरोदर राहिली होती.
मुल खाली करण्यासाठी बराच खर्च होता. मात्र पैसे नसल्यानं आमच्यात वाद होत होता. घटनेच्या दुपारी संमतीने संबंध ठेवत असताना प्रेयसीनं अपमान केल्यानं राग अनावर झाला. शेवटी गळा आवळून तीचा खून केल्याची कबूली आता आरोपीनं दिली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.



0 Comments