प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला मिळाली मुदतवाढ... आता दि. 4 सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन


पंढरपूर:  कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी  विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन  करण्यासाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे.  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणार्‍या दहावी नंतरच्या  डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन साठी मुदत वाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता दिनांक 4 सप्टेंबर 2020 अखेर पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज डीटीईच्या वेबसाईटवरून भरता येणार आहेत. या अगोदर रजिस्ट्रेशन  करण्याची मुदत 25 ऑगस्ट पर्यंतच दिली होती. त्यात आता वाढ झाली असून विद्यार्थ्यांना 4 सप्टेंबर पर्यंत मुदत दिल्याने इंजिनीअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूरचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.     

         यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावरती दिनांक 7 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दिनांक 8 ते 10 सप्टेंबर या दरम्यान करता येईल. यानंतर 10 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर पाहता येईल. दिनांक 25 ऑगस्ट ते 4  सप्टेंबर पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. मागील वर्षी राज्यातील केवळ चार डिप्लोमा कॉलेजमध्येच 100 टक्के ऍडमिशन झाले होते. खाजगी महाविद्यालयांमध्ये 100 टक्के ऍडमिशन होणारे स्वेरीचे डिप्लोमा कॉलेज हे राज्यातील एकमेव कॉलेज ठरले. यंदाही स्वेरी कॉलेजला पालकांनी व विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली आहे.

 संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सुविधा केंद्राचे कामकाज सुरु आहे. या अनुषंगाने सुविधा केंद्रावर पालकांची व विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी पहावयास मिळते आहे.  या मुदतवाढीचा लाभ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच अजून ज्यांना डिप्लोमा अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे परंतु अद्याप ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एस. एस. गायकवाड- मोबा.क्र.9890566281 यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे. 

छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे,स्वेरी चिन्ह व प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ.

पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Post a Comment

0 Comments