पंढरपूर सिंहगड मध्ये मेकॅट्राॅनिक्स व इंडस्ट्री ऑटोमेशन प्रोजेक्ट कसे निवडावेत या विषयावर वेबिनार संपन्न




पंढरपूर: प्रतिनिधी
                                   कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागांतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टूडंट असोसिएशन आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन दि. १८ व १९ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ‘मेकॅट्राॅनिक्स व ऑटोमेशन कंपनी मान्य प्रोजेक्ट कसे निवडावेत’ या विषयावर कॅडकॅमगुरु, पुणे यांचे सचिन चितापूरे यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
  ऑनलाईन वेबिनार मध्ये सचिन चितापूरे यांनी शेवटच्या वर्षातील प्रोजेक्टचे महत्त्व हे फक्त विद्यापीठाच्या परीक्षेपुरतेच मर्यादित न करता ते नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी प्रोजेक्टचा विषय कसा निवडावा व त्याचे योग्य नियोजन कसे करावे हे सांगितले. प्रोजेक्ट नियोजनावर बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या हाती असलेला वेळ व काम यांचा योग्य समन्वय साधून आठवड्यातुन किती तास काम करावे लागेल याचे गणित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
दरम्यान आपल्या कंपनीतील अनुभव व माहिती विद्यार्थ्यांना दिली. यातील महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांची लाॅकडाऊनमुळे
होणारी अडचणी व गैरसोय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ‘स्टे होम स्टे सेफ’ असे सांगत ऑनलाइन प्रोजेक्टचे स्वरूप व महत्त्व पटवून दिले. तसेच घरबसल्या कमीतकमी खर्चात उत्तम प्रोजेक्ट कसा करता येईल याची माहिती दिली.
             याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मेकॅट्राॅनिक्सचे प्रोजेक्ट कसे हाताळावे व त्यासाठी लागणारे ज्ञान याची जाणीव करून दिली. प्रोजेक्ट पूर्णत्त्वाच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांन करुन दिली. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट करते वेळी येणाऱ्या अडचणी व त्यावरील मार्ग यांवर देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसह ऑनलाईन सहभागी विद्यार्थ्यांना पटवून दिली. मेकॅट्राॅनिक्स प्रोजेक्टची कंपनीच्या दृष्टीने गरज व महत्त्व पटवून देऊन इतर नवीन प्रोजेक्टची माहिती ॲनिमेशनच्या माध्यमातून दिली.

हे ऑनलाईन वेबिनार मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. हृषिकेश देशपांडे, प्रा. अतुल कुलकर्णी सह मेसा विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धेश्वर दळवी, ऋतुजा पाटील, स्वप्नील जरे, सुहास जाधव, अजिंक्य कोळवले, ओंमकारेश्वर अडवळकर सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments