बॉलीवुड मधील तारका कशासाठी घेतात ड्रग्ज? 'या' अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

नेमके बॉलीवूडमधील कलाकार ड्रग्सचे सेवन का करतात? यासंदर्भात धक्कादायक खुलासा राखी सावंत या अभिनेत्रीने केला आहे. एका मुलाखतीत राखीने सांगितले आहे की, बॉलीवूड आणि ड्रग्सचे कनेक्शन नेमके काय आहे. राखी म्हणाली की, बॉलीवूडमध्ये ग्लॅमरला सर्वाधिक महत्व आहे. ग्लॅमरसाठी कलाकार मंडळी ड्रग्सचं सेवन करतात. तसेच कलाकारांचे वजन वाढू नये यासाठी ड्रग्सचे सेवन करा असा सल्ला दिला जातो. मलाही काही वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी ड्रग्स सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे झाले. NCB ने यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना ड्रग्स कनेक्शनमध्ये तुरुंगात टाकले आहे. त्यानंतर बाकीच्या ड्रग्स प्रकरणात अनेक मोठ्या कलाकारांचे नाव आले आहे त्यात दीपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांचे नाव आहे.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>यामागचे कारण असे आहे की, ड्रग्स घेतल्यामुळे भूक लागत नाही. वजनावर नियंत्रण राखलं जातं. पण मी त्यावेळी ड्रग्सच्या ऐवजी हॉट योगाची निवड केली. बॉलीवूडमधील कलाकारांना व्यायाम आणि योगा करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी ते वजन कमी करण्यासाठी असल्या शॉर्टकटचा वापर करतात. असा धक्कादायक खुलासा राखी सावंत ने केलाय.

दरम्यान, ड्रग्स प्रकरणात ड्रग्स चॅट समोर आल्यानंतर यामध्ये दीपिका पादुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचे नाव आले आहे. तसेच दीपिकाच्या मॅनेजरने खुलासा केला आहे ज्या ग्रुपवर ड्रग्सबद्दल चॅट व्हायची त्या ग्रुपची ऍडमिन ही दीपिका पादुकोनच होती.



पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Post a Comment

0 Comments