पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्याने बनवले चीनच्या कॅमस्कॅनर ॲप्लीकेशनच्या तोडीचे ॲप्लीकेशन ! सिंहगडच्या श्रीकृष्ण दिवसे या विद्यार्थ्यांकडून "स्कॅनइटइंडिया" नावाच्या ॲप्लिकेशनची निर्मिती


○ चीनच्या कॅमस्कॅनर ॲप्लिकेशनला टक्कर देण्यासाठी इंडियाचे "स्कॅनइटइंडिया" ॲप्लिकेशन मार्केट मध्ये आणले

पंढरपूर: प्रतिनिधी 
गेल्या अनेक दिवसांपासून भारत देश चीनी वस्तु व मोबाईल मधील काही ॲप्लिकेशनवर बंदी घालत असतानाच कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयात  अभियांत्रिकी चे शिक्षण पुर्ण केलेले माजी विद्यार्थी कु. श्रीकृष्ण दिवसे या विद्यार्थ्यांने चीनच्या "कॅमस्कॅनर" ॲप्लिकेशनला टक्कर देण्यासाठी इंडियाचे "स्कॅनइटइंडिया" ॲप्लिकेशन मार्केट मध्ये आणले असुन या ॲप्लिकेशन चा फायदा भारतीय नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे श्रीकृष्ण दिवसे यांनी सांगितले.

    भारतीय फोन ॲप्लिकेशन मार्केट हे हजारो कोटी रुपयांचे असून, या मध्ये सर्वाधिक ॲप्लिकेशन हे चिनी बनावटीचे आहेत. काही दिवसांपासून चायना चे ॲप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे. चीनी कॅमस्कॅनर च्या ॲप्लिकेशन ला टक्कर देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी श्रीकृष्ण दिवसे यांनी स्वतःच्या "स्टान्सकोड टेक्नाॅलाॅजी कंपनी कडून "स्कॅनइटइंडिया" नावाचं  भारतीय अँप्लिकेशन मार्केट मध्ये आणलं आहे.

    या अँप्लिकेशनचा फायदा विद्यार्थ्यांना आपल्या नोट्स सह इतर गोष्टी स्कॅन करून पीडीएफ मध्ये कनव्हर्ट करता येणार आहेत. याशिवाय पीडीएफ स्कॅन केलेल्या पेजमधला अनावश्यक मजकुर सुद्धा काढू टाकता येणार आहे. सर्व सामान्य नागरिकांना "स्कॅनइटइंडिया" या अँप्लिकेशनच्या माध्यमातून आधार कार्ड, पॅन कार्ड, सातबारा उतारा व अन्य कागपञे स्कॅन करून जतन करू ठेवता येणार आहेत. हे अँप्लिकेशन अॅनराॅईड मोबाईल च्या  प्ले स्टोअर मधुन फ्री मध्ये डाऊनलोड करता येते. याशिवाय भविष्यात नोकरी बदल माहिती, व्हिडिओ बनविणे, फाईल शेर करणे, ह्या गोष्टी अँप मध्ये आणण्याचा मानस कंपनीचा असल्याचे श्रीकृष्ण दिवसे यांनी सांगितले.

    पंढरपूर सारख्या ग्रामीण भागातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थी स्वतःच्या कर्तृत्वावर विविध क्षेत्रात चमकत आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. सुधा सुरवसे, प्रा. समीर कटेकर, प्रा. अनिल निकम आदी सह महाविद्यालयातील अनेक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. हे अँप्लिकेशन पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण दिवसे सह "स्टान्सकोड टेक्नाॅलाॅजी कंपनीतील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Post a Comment

0 Comments