स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातर्फे अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आणि ए. आय. सी. टी. इ. ट्रेनिंग अँड लर्निंग (अटल) अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअरिंगच्या शिक्षकांसाठी पाच दिवसांचा ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. सेंन्सर, मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन फॉर रोबोटिक्स या विषयावर हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम दि. ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२० दरम्यान संपन्न झाला.

 >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>या ऑनलाइन प्रोग्राममध्ये विविध राज्यातून जवळपास दोनशे शिक्षकांनी सहभाग घेतला होता. कणाद इलेक्ट्रोमेशन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडसांगलीचे संचालक संजय जोगळेकर यांनी पहिल्या दिवशी सेन्सर रोबोटिक्स अँड ड्रोन’ या विषयातील इलेक्ट्रॉनिक्स सर्कीट डिझाईन कसे करायचे या संदर्भात माहिती दिली. दुसऱ्या दिवशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरचे प्रोफेसर डॉ. के. राजन्ना यांनी थीन फिल्म टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या सेन्सर संदर्भात माहिती दिली व त्याचे उपयोग सांगितले. तसेच तिसऱ्या दिवशी डॉ. एम. एम. नायक यांनी ‘मेम्स टेक्नॉलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. एनआयटी भोपाळचे प्राध्यापक डॉ. विजय बी. यांनी ‘बाय पॅडल रोबोट्स’ तसेच ‘हॅन्ड गेश्चर रेकॉग्निशन एच.एम.एम.’ मॉडेलचे डिझाईन शिकवले. रोबो लॅब टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडपुणे चे को-फौंडर तसेच संचालक  असणारे प्रतिक देशमुख यांनी टिंकर कॅड’ या टूलच्या साह्याने ‘रोबोटिक हॅन्ड’चे आभासी प्रात्यक्षिक करून दाखविले. पाचव्या दिवशी नेरुल येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅट्रॉनिक्सच विभागाचे विभागप्रमुख प्रा. विक्रम व्यवहारे यांनी रोबोटिक इंटेलिजन्स’ यावर माहिती दिली. या प्रोग्रामची सांगता स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावरती लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देऊन करण्यात आली. स्वेरीचे संस्थापक सचिव तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रा. आशिष जाधव आणि सहकाऱ्यांनी पाच दिवसांचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्तम प्रकारे आयोजित केला होता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे स्वेरी चिन्ह व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभुते.


पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)


पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Post a Comment

0 Comments