राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन

 

श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये शिक्षक दिन’ साजरा

पंढरपूरः समाजामध्ये पिता-पुत्रमाता-बालक असे विविध प्रकारचे नातेसंबंध आहेत परंतु यामध्ये गुरू-शिष्याचे नाते अत्यंत महान असून ते केवळ माणसांमध्ये दिसून येते. मनुष्य सोडून इतर कोणताही प्राणी इतरांना ज्ञान देत नाही. भारतात गुरू-शिष्याची महान परंपरा असून राम-कृष्णछत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरूंनी आपल्यापेक्षा श्रेष्ठ शिष्यांची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून अनेक शिष्यांनी गुरूच्या मार्गदर्शनाने उच्च शिखरे पादाक्रांत केलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास व जिद्द निर्माण करणे हेच गुरूंचे  कार्य आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपल्यातील क्षमता जागृत करायला हव्या. शिक्षक हा केवळ एक पेशा नसून ते एक व्रत आहे.’ असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.

              गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटपंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत शिक्षकांची भूमिका’ या विषयावर विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी प्रवेशद्वाराजवळ भारतरत्न डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन माजी विद्यार्थी संदीप अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगेविश्वस्त एच.एम. बागलमाजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार,युवा विश्वस्त सुरज रोंगेडॉ.स्नेहा रोंगेइतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रत्येक वर्षी ‘शिक्षक दिन’ स्वेरीच्या भव्य ओपन थिएटर मध्ये घेण्यात येतो परंतु कोरोना महामारीमुळे आज प्रथमच महाविद्यालयाच्या पोर्चमध्ये साजरा करण्यात आला. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा.सी.बी. नाडगौडा यांनी आभार मानले.

छायाचित्रः- शिक्षक दिनानिमित्त भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना माजी विद्यार्थी संदीप अवघडे सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेयुवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगेप्राध्यापक वर्ग आदी.


पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Post a Comment

0 Comments