सिंहगडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात ऑनलाईन क्वीझ संपन्न

 
पंढरपूर: प्रतिनिधी 
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विद्युत अभियांत्रिकी विभागात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ईसा असोसिएशन मार्फत सी आणि सीप्लसप्लस या भाषांवर आधारित ऑनलाईन क्वीझ आयोजित करण्यात आली होती. क्वीझ उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    ५ सप्टेंबर हा दिवस डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून सर्वञ साजरा केला जातो. यावर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात क्वीझ हे ईसा असोसिएशन मार्फत सी आणि सीप्लसप्लस या भाषांवर आधारित ऑनलाईन क्वीझ ही ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. क्वीझ ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. क्वीझ मध्ये ४० पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ई-सर्टिफिकेट देण्यात आले. 
    विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्वीझ आयोजित करण्यात आली होती. ही ऑनलाईन क्वीझ यशस्वी करण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रा. लोकेश स्वामी, प्रा. दत्तात्रय काळेल, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. शशिकांत गिड्डे, प्रा. अर्चना वाघमोडे यांनी परिश्रम घेतले. 


पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Post a Comment

0 Comments