केंद्र शासनाने आधारभूत किंमती जाहीर केल्या असून मूग प्रती क्विंटल 7196 रूपये, उडीद प्रती क्विंटल 6000 रूपये असा हमीभाव आहे. जिल्ह्यात सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, बार्शी, कुर्डूवाडी याठिकाणी 15 सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पीक पेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स (खाते क्रमांक आणि आयएफएससी कोडसह) सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर खरेदी केंद्रावर माल कधी आणावा याचा नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस येईल. त्यानंतरच शेतकऱ्यांनी वाळलेला, स्वच्छ व काडीकचरा विरहित माल खरेदी केंद्रावर आणावा. खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना बँक तपशिलाप्रमाणे एनईएमएल पोर्टलवरून परस्पर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. वाडेकर यांनी केले आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!




0 Comments